हवे तुझे दर्शन मजला,Have Tujhe Darshan Majala

हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी
प्रभू तुझ्या दारी आलो, हो‌उनी भिकारी

नको देउ पैका अडका, सोनियाचि खाण
माझ्या मुखी तव नामाची, पडू नये वाण
घडो तुझी सेवा म्हणुनी, आज रामपारी

एकनाथ, तुकया, गोरा, कबीर, सुदाम
जनाबाई, सखु, मीरेच्या मुखी तुझे नाम
तयापरी झालो वेडा, धाव रे मुरारी

प्रेमगाठ बांधुनि केली, अंतराचि झोळी
दोन करांची मी धरिली, तुझ्यापुढे थाळी
कृपाप्रसादाची तुझिया, घ्यावया शिदोरी

1 comment:

  1. अतिशय सुंदर गीत. "मराठी गीतमाला" ने मराठीचा झेंडा उंच फडकत ठेवला आहे ही गोष्ट खूप दिलासा देणारी आहे. बाकी जगात तर आनंदीआनंदच आहे. असो. खूप चांगले संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्यावर मनापासून धन्यवाद. आणि खूप शुभेच्छा.

    ReplyDelete