Showing posts with label S-पंडितराव नगरकर. Show all posts
Showing posts with label S-पंडितराव नगरकर. Show all posts

तू पाक सूरत कामिना,Tu Pak Surat Kamina

तू पाक सूरत कामिना, कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनीया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती

नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तू चंद्रकळा सवती, गायनामध्ये गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कंती
तुला गुणिजन अवघे चहाती

नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती

ती पाहताच बाला,Ti Pahatach Bala

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला, की आरपार गेला

स्वर्गातल्या पऱ्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधिने, रचिला तिचा छबेला

लावण्य काय सारे, उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला

डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती, तिज अन्‌ पहावयाला

गोल तुझ्या शरीराचा,Gol Tujhya Shariracha

गोल तुझ्या शरीराचा डौल वर गोरा रंग नवती कवळी
वय नूतन हाती निऱ्या, चालणे चपळगती, नागीण पिवळी


अधरकुटी बत्तीस हिरकण्या एकावळी नग विराजती
ओठ शुद्ध पवळ्याचा रंग, लाजावी पाहून जावेळी ग ती

मंजूळ स्वर ऐकून कोकिळा वृत्ती बसुनी मनी गजबजती
जानु-जंघ सुकुमार पोटऱ्या अति नाजूक ग कर्दळी