ती पाहताच बाला,Ti Pahatach Bala

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला, की आरपार गेला

स्वर्गातल्या पऱ्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधिने, रचिला तिचा छबेला

लावण्य काय सारे, उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला

डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती, तिज अन्‌ पहावयाला