अधीर याद तुझी, जाळितसे रे दिलवर
अशीच वाट तुझी, पाहु किती मी दिलवर ?
तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलून हासु कशी, एकटीच मी दिलवर ?
ते स्वप्न आज निखाऱ्यांत जहाले घायल्
हवा तुझाच बसंती, बहार रे दिलवर्
मदीर ध्यास तुझा, छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता, तुजवरती रे दिलवर्
No comments:
Post a Comment