अशा या सांजवेळेला Asha ya Sanjvelela

अशा या सांजवेळेला सुखाचा गंध हा आला
रिकाम्या ओंजळीला ह्या फुलांचा भार का झाला

निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया
निळ्या अंधार लाटेचा किनारा पैंजणे झाला

कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले
मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला

पहाटे स्वप्‍नपक्षांनी किनारे झाकले दोन्‍ही
मिठीच्या वादळाकाठी उसासा चंदनी झाला

Lyrics - Anil Kamble   अनिल कांबळे
Music - Anand Modak     आनंद मोडक
Singer - Ranjana Joglekar     रंजना जोगळेकर

No comments:

Post a Comment