Showing posts with label S-भार्गवराम आचरेकर. Show all posts
Showing posts with label S-भार्गवराम आचरेकर. Show all posts

लग्नाला जातों मी, Lagnala Jato Mi

लग्नाला जातों मी द्वारकापुरा ।
देतो निज भगिनी राम कौरवेश्वरा ॥

उत्सव बहु थोर होत ।
मिळतिल बहु भूपाल अमित ।
सुर नर मुनि सर्व येत ।
नट नर्तक सकल जमत ।
न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥

या प्रणयी ललना,Ya Pranayi Lalana

या प्रणयी ललना मना । ये परकामना ।
आभास दे भयभावना ॥

मानमया हृदया अबलेच्या । कटुता ये हताश दीना ॥

प्रिया सुभद्रा घोर वनीं,Priya Subhadra Ghor Vani

प्रिया सुभद्रा घोर वनीं ह्या निशाचरें भेटविली ।
हेंचि कळेना गुप्त कशी ती एकाएकीं झाली ॥

मायावश केलें । की मज स्वप्नचि हें पडलें ॥

परम सुवासिक पुष्पें,Param Suvasik Pushpe

परम सुवासिक पुष्पें कोणी चातुर्यें गुंफिती नारी
सुगंध तैलें वासित करिती शय्यावस्त्रें धरुनि करीं

नानापरिचे विडे मनोहर तबकांमध्यें कोणि भरी
अंगराग ते तयार करुनी ठेविति शेजेशेजारीं
खिडक्यांचे वाळ्याचे पडदे भिजवुनि कोणी गार करी
गुलाबपाणी थंड करोनी शिंपित कोणी गच्चिवरी
सर्व तयारी नीट कराया दक्ष असति जन किती तरी
वाटे मज मंदिर हें करिलचि वैकुंठाची बरोबरी ॥

दिन गेले भजनाविण सारे,Din Gele Bhajanavin Sare

दिन गेले भजनाविण सारे

बालपणा रमण्यात गमविला
यौवनात धन-लौकिक प्यारे


मोहापायी मूळ हरपले अजुनी शमेना तृष्णा का रे
म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे

गवळण होउनिया,Gavalan Hovuniya

गवळण होउनिया फिरता ।
धरतिल तव पद राजसूता ॥

प्रेमळ कोमल येथ वसे बल ।
तूचि नृपति-दल आता ।
धन्य धन्य बहु होईल वधुगण
ही मम गवळण नमिता ॥