अंध बिचारी मी जरी बाला
पाहिले न कधी शशीसूर्याला
वाण नसे परी आनंदाला
कारण अंध अशि मी बाला ॥
कळ्या फुलांचा रंग तजेला
कसा दिसावा अभागिनीला
परी ते देती सुगंध मजला
कारण अंध अशि मी बाला ॥
पक्षांच्या नभी उडत्या लीला
कुठुन पहाणे या जन्माला
मला ऐकविती परी गानाला
कारण अंध अशि मी बाला ॥
प्रेमाचे मधुबोल हे जगीं
देवाची अंधास देणगी
सकल बोलती प्रेमळ बोला
कारण अंध अशि मी बाला ॥
No comments:
Post a Comment