वाऱ्याने हलते रान,Varyane Halate Raan

वाऱ्याने हलते रान
तुझे सुनसान
हृदय गहिवरले;
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले .....

डोळ्यात शीण
हातात वीण
देहात फुलांच्या वेगी;
अंधार चुकावा म्हणून
निघे बैरागी .....

वाळूंत पाय
सजतेस काय ?
लाटान्ध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
तुझ्या की ओठी ?

शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद
तुझा की वैरी ?

No comments:

Post a Comment