Showing posts with label निवडूंग (१९८९). Show all posts
Showing posts with label निवडूंग (१९८९). Show all posts

लवलव करी पात,Lavlav Kari Paat

लवलव करी पात डोळं नाही थाऱ्याला
एकटक पाहु कसं लुक-लूक ताऱ्याला

चवचव गेली सारी जोर नाही वाऱ्याला
सुटं-सूटं झालं मन धरू कसं पाऱ्याला

कुणी कुणी नाही आलं फडफड राव्याची
रूणझूण हवा का ही गाय उभी दाव्याची

तटतट करी चोळी तुटतुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारूबाई साठीची

ना मानो गो तो दूँगी,Na Mano Go To Dungi

ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे
अंग भिजविले माझे, माझी ओढली शेलारी, रे
जा जा ना, कान्हा, छेडू नको भारी, रे
ऐसो होरीको खिलारी भर मारी पिचकारी, रे !

गोरी गोरी बाँकी मैं कुरुप तू काळा, रे

गोवळ्याच्या पोरा, तुझा भलता हा चाळा, रे
बाजुबंद खोल मोरी चुनरी भी भारी, रे !

नई रे, चुनरिया अबही मंगाई
खेचाखेची पदराची काय करू, बाई !
फोड दी गगर मोरी कंकरिया मारी, रे
ना मानो गो तो दूँगी तोहे गारी, रे !

तू तेंव्हा तशी,Tu Tevha Tashi

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंचीतू ऐल राधा,
 तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तू काही पाने, तू काही दाणे
तू अनोळखी फुलांची
तू नवीजुनी,
 तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची
तू  हिर्वी-कच्ची,
तू पोक्त सच्ची
तू खट्टीमिठ्ठी ओठांची
तू कुणी पक्षी :
 पिसांवर नक्षीकवितेच्या ईश्वराची



घर थकलेले संन्यासी,Ghar Thakalele Sanyasi

घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झऱ्याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई