गोविंदा रे गोपाळा रे,Govinda Re Gopala Re

गोविंदा रे गोपाळा रे
छंद तुझा जडला, घननीळा

जगजेठी हा बनुनी गुराखी
पाठीवरती घोंगडी टाकी
यमुनातीराला नेतो कपिला असा हा हरी सावळा

व्याकूळ अंतर राहि निरंतर
नयनीचे नीर झरते झरझर

दर्शन दे रे आता मजला तुझ्या दासा नंदलाला

No comments:

Post a Comment