मी वाजवीन मुरली,Mi Vajaveen Murali

मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा

कालिंदिचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी न्‌ माझी सांगू नकोस लोकां

लोकांस काय ठावे संबंध हे युगांचे
हे वेगळेच नाते प्रेमातल्या जनांचे
दिसतो जरी न वारा झुलती कदंबशाखा

मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही ही बंधने तरी का ?

No comments:

Post a Comment