उठा उठा सूर्यनारायणा,Utha Utha SuryaNarayana

उठा उठा सूर्यनारायणा
थांबली सुवासिनी, पूजना

किरणहार हे गुंफित आली
उषासुंदरी धुक्यात न्हाली

नवरंगांची उधळण झाली गगनाच्या अंगणा

विझल्या तारा, वाहे वारा
शोधीत पक्षी चिमणा चारा
घरोघरीच्या अमृतधारा भूषविती गोधना

गावचि अवघे झाले जागे
दिनक्रमाचे जोडा धागे
धरतीवरती उतरू लागे तेजाचा पाहुणा

No comments:

Post a Comment