Showing posts with label S-चंद्रशेखर गाडगीळ. Show all posts
Showing posts with label S-चंद्रशेखर गाडगीळ. Show all posts

माणसा रे माणसा ठेव,Manasa Re Manasa Thev

माणसा रे माणसा ठेव माणुसकीची लाज
कशासाठी माणुसकीला विसरला रे आज
जय जय विठ्ठ्ल, जय हरी विठ्ठ्ल

जिने तुला देली जन्मोजन्मी साथ
तिचा तरी हात सोडू नको
कुंकू लावियलं तुझ्या नावे भाळी
तिच्या हाती झोळी देऊ नको
जिने तुझ्या घरी पेटवली चूल
तिचे तरी हाल करू नको

आपुल्या हातानं खणुनिया खड्डा
आपुलाच मुडदा गाडू नको
आपुलेच प्रेत खांद्यावर घेत
वाजत गाजत जाऊ नको
साधू संत म्हणती जगी वादळात
रहा बिनधास्त आनंदात

देवमानुस देवळात आला,Devmanus Devalat Aala

धरमशाळंचं देऊळ झालं, चिमित्कार झाला
देवमानुस देवळात आला !

या उजाड माळावरती, माझ्या देवानं केली पिरती
फुलबागेचं रूप पाहुनी, हरपून जीव गेला
देवमानुस देवळात आला !

गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात
दळिंदराच्या अंगावरती, किरणांचा शेला
देवमानुस देवळात आला !

वस्तीवाडी ही खुळी झोपडी, मायलेकरं ही येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा, उद्धार लई केला
देवमानुस देवळात आला !

अरे कोंडला कोंडला देव,Are Kondala Kondala Dev

अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला
द्वारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला

भक्तासाठी केला उभा हा संसार, भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर करणी देवाची, माया जोडण्याची भक्ती ठेवी

उजेड अंधार देवाचं हे रूप त्याते मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी वाट द्या मोकळी विश्वाचा तो माळी होई भक्ता

गरिब श्रीमंत त्याची तुला खंत, गरिबाचा संत तोच भक्त
सेवाधर्म सारा करावा मुकाट मागे कटकट ठेवू नये

अरूपास पाहे रूपी,Arupasi Pahe Rupi

अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत

कधी पावसाच्या धारा
भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा
हसे रूपवंत

ग्रीष्म रक्त पेटविणारा
शिशिर आग गोठविणारा
मनोगते मिळविणारा
फुलारी वसंत

कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे
सर्व नाशवंत

अन्‌ हल्लगीच्या तालावर,An Hallagichya Talavar

अवं लढाईवरनं आला ....... आला
माझ्या अर्जुनाचा गाडा ....... गाडा
त्याला बगायाला जमं ....... जमं
सारा धनगर वाडा ....... सारा धनगर ....... वाडा

अवं थांबा जरा, मागं सरा
रिंगण धरा अन्‌ बोला माझ्या भावांनो
'बिरोबाच्या नावानं चांगभलं'

अन्‌ हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं सोंड फिरं गरारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ प्वाट वाजं नगारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अवं लाडं लाडं मारतो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसा आबाळात फव्वारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ ढग्गाच्या या रूपानं ह्यो पानी पाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा


अवं ठुम्मक ठुम्मक बशितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ नादामंधी उठितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
आरं खेळाची ही नशा रं ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसं दोनी डोळं मिटितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ इंदराचा ऐरावत येला लाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अजून आठवे ती रात,Ajun Aathave Ti Raat

अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंद आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी

आज या एकांत काली, Aaj Ya Ekant Kali

आज या एकांत काली, मीलनाची पर्वणी

दूर का तू साजणी, दूर का तू साजणी



सोड खोटा राग रुसवा, हा बहाणा काय फसवा

लाजरी मूर्ती तुझी ही, अधिक वाटे देखणी


देखणी हे साजणी, दूर का तू साजणी



दो जीवांच्या संगतीने फुलून येती फूल पाने

दिवस होई रात्र येथे, रात्र वाटे चांदणी

चांदणी हे साजणी, दूर का तू साजणी



हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे, हास थोडे

स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी

मागणी हे साजणी, दूर का तू साजणी