अवं लढाईवरनं आला ....... आला
माझ्या अर्जुनाचा गाडा ....... गाडा
त्याला बगायाला जमं ....... जमं
सारा धनगर वाडा ....... सारा धनगर ....... वाडा
अवं थांबा जरा, मागं सरा
रिंगण धरा अन् बोला माझ्या भावांनो
'बिरोबाच्या नावानं चांगभलं'
अन् हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा
अवं सोंड फिरं गरारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन् प्वाट वाजं नगारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अवं लाडं लाडं मारतो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसा आबाळात फव्वारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन् ढग्गाच्या या रूपानं ह्यो पानी पाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा
अवं ठुम्मक ठुम्मक बशितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन् नादामंधी उठितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
आरं खेळाची ही नशा रं ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसं दोनी डोळं मिटितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन् इंदराचा ऐरावत येला लाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा
No comments:
Post a Comment