Showing posts with label कैवारी (१९८१). Show all posts
Showing posts with label कैवारी (१९८१). Show all posts

प्रेमाला उपमा नाही,Premala Upama Nahi

मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिउनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू, हे फूल म्हणू की पाने

किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू, हे परीस म्हणू की सोने

का नकळत डोळे मिटती
स्पर्शात शहारे उठती
मी कशी भावना बोलू, हे शब्द म्हणू की गाणे



देवमानुस देवळात आला,Devmanus Devalat Aala

धरमशाळंचं देऊळ झालं, चिमित्कार झाला
देवमानुस देवळात आला !

या उजाड माळावरती, माझ्या देवानं केली पिरती
फुलबागेचं रूप पाहुनी, हरपून जीव गेला
देवमानुस देवळात आला !

गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात
दळिंदराच्या अंगावरती, किरणांचा शेला
देवमानुस देवळात आला !

वस्तीवाडी ही खुळी झोपडी, मायलेकरं ही येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा, उद्धार लई केला
देवमानुस देवळात आला !