Showing posts with label S-वेसावकर आणि मंडळी. Show all posts
Showing posts with label S-वेसावकर आणि मंडळी. Show all posts

मी हाय कोली सोरिल्या,Mi Haay Koli Sorilya

मी हाय कोली सोरिल्या डोली, न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी

वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी
कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी
चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी
सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी

सर्गा नि हलवा ताजं हय्‌ म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय्‌ सोनेरी
घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणताय म्हावरं सोनेरी

मी हाय कोली सोरिल्या डोली, न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी

एकविरा आई तू डोंगरावरी,Ekveera Aai Tu Dongaravari

एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी

कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग
पाठीशी उभी हाय एकविरा आई ग
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा

मागनं मांगतंय एकविरा आई ग
धनी माझा येऊदेस दर्या किनारी ग
दसऱ्याचे आई तुझे सणाला
जोऱ्यांशी येऊ आई तुझे होमाला


नवसाचा मान देऊ कोमबऱ्या-बकऱ्यांचा ग
खना-नारलाशी भरीन ओटी ग
चैताचे आई तुझे सणाला
पोरांशी येऊ आई तुझे भेटीला