घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा
आसनी शयनी भोजनी गमनी, छंद तुझा आम्हां
दृष्या तीच, पूर्णब्रम्ह, नित्य निर्विकारा
अंबुजदल, नयना, मुनि मानस विहारा
सर्वसाक्षी सर्वोत्तम, सर्व गुरुरूपा
प्रेमचित्ता, सौख्यसिंधू, दशरथकुलदीपा
मास दास भ्रात नाथ, तूच एक पाही
केशव म्हणे, करी कृपा शरण तुझ्या पायी
No comments:
Post a Comment