गंगा-जमुना दोघ्या बयनी गो पानी झुलझुल व्हाय
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाय-जुई-जाय
माशांनी मारलाय दनका गो पानी दलाला जाय
कोल्याची पोर एक सोबेची तया उबीच हाय
नेसली पैठण सारी गो पदर वाऱ्यानी जाय
अंगान् चोली गझनिची पोरी ठुमकत जाय
नाखवा गेलाय् डोलिला पोरी करशील काय
आंब्याच्या डांगलीवर बसलाय् मोर, नवरीचा बापुस कवठं चोर
करवल्या खुइताना आंब्याच्या डांगल्या म्हायेरा जावालं सांजवलं
आंब्याची डांगली हलविली नवऱ्याने नवरीला पलविली
No comments:
Post a Comment