तू पाक सूरत कामिना, कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनीया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती
नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तू चंद्रकळा सवती, गायनामध्ये गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कंती
तुला गुणिजन अवघे चहाती
नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती
No comments:
Post a Comment