जनी म्हणे पांडुरंगा,Jani Mhane Panduranga

जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥


कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥


कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

No comments:

Post a Comment