Showing posts with label M-वसंतकुमार मोहिते. Show all posts
Showing posts with label M-वसंतकुमार मोहिते. Show all posts

वेड्या बहिणीची रे वेडी,Vedya Bahinichi Re Vedi

सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया

माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई, चंद्रसूर्याची
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे

चांदीचे ताट, चंदनाचा पाट
सुगंधी गंध दरवळे, रांगोळीचा थाट
भात केशराचा, घास अमृताचा
जेवू घालिते भाऊराया रे

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांचा सर, येई भूमिवर
पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे

पंचप्राणांच्या वाती, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया

पडला पदर खांदा,Padala Padar Khanda

पडला पदर खांदा तुझा दिसतो ग
कमरेला कमरपट्टा कसतो ग बाई कसतो

काळ्या कुरळ्या वेणीत मरवा

जरतारी शालू हिरवा
गोऱ्या दंडात बाजूबंद खुलतो

सफरचंदाची गाली गुलाली
फुटलं डाळींब ओठांच्याखाली
राघू नाकाचा नुसताच रुसतो

तुझ्या तरुणपणाला ग धार
मार भिवईंची काळी कट्यार

घाव वर्मावरी असा बसतो



चाळ माझ्या पायात,Chaal Majhya Payat

चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात, मोरावाणी
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित, तुझ्या मनी, रे

डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनात, हसते गालात
झुलते मी सुरांत, रातराणी, रे

नाजूक ओठाखाली
छोटीशी बाई करांगुली
लाजते मी मनात, कशि सांगु जनात
नांदू दोघं जशी, राजा-राणी, रे

रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या ताऱ्यात डुलते तोऱ्यात
शोभते शुक्राची मी चांदणी, रे



खुलविते मेंदी माझा रंग,Khulavite Mendi Majha

खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान बाई ग केवड्याचं रान


दोन डोळे नंदादीप, पेटले हे आपोआप
काजळली पापण्यांची, बदामी कमान हो रंग गोरापान

नीलमणी नयनांत, हिरकण्यांचे हो दात
ओठ लाल लाल माझे, माणकासमान हो रंग गोरापान

नवी लाज लाजते मी, नवा साज साजते मी
लाजऱ्या मनाला माझ्या, करा बंदिवान हो रंग गोरापान



असा कसा खट्याळ तुझा,Asa Kasa Khatyal Tujha

गोकुळीच्या ग आम्ही नारी, छळितो बाई तुझा मुरारी
खोड्या करितो ग अमुच्या भारी

असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

मध्यरात्री आला चोरावाणी, यांची बांधिली दाढी आणि माझी वेणी
ओढाओढीत मोडल्या आमच्या माना की बाई आमच्या माना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

मथुरेची हा अडवितो वाट, ओढितो दह्या दुधांचे ग माठ
भर रस्त्यात घाली धिंगाणा की बाई धिंगाणा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

ऐकुनी मुरलीचे सूर, लागते मनी हुरहुर
घरकामात मन करमेना ग बाई करमेना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !



अत्तराचा फाया तुम्ही,Attaracha Phaya Tumhi

अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया

नाही आग नाही धग, परी होइ तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया

सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया



अत्तराचा फाया तुम्ही

अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई

धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया

नाही आग नाही धग, परी होइ तगमग

विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया

सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद

देहभान मी विसरावे, अशी करा माया