असा कसा खट्याळ तुझा,Asa Kasa Khatyal Tujha

गोकुळीच्या ग आम्ही नारी, छळितो बाई तुझा मुरारी
खोड्या करितो ग अमुच्या भारी

असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

मध्यरात्री आला चोरावाणी, यांची बांधिली दाढी आणि माझी वेणी
ओढाओढीत मोडल्या आमच्या माना की बाई आमच्या माना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

मथुरेची हा अडवितो वाट, ओढितो दह्या दुधांचे ग माठ
भर रस्त्यात घाली धिंगाणा की बाई धिंगाणा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !

ऐकुनी मुरलीचे सूर, लागते मनी हुरहुर
घरकामात मन करमेना ग बाई करमेना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !No comments:

Post a Comment