चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात, मोरावाणी
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित, तुझ्या मनी, रे
डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनात, हसते गालात
झुलते मी सुरांत, रातराणी, रे
नाजूक ओठाखाली
छोटीशी बाई करांगुली
लाजते मी मनात, कशि सांगु जनात
नांदू दोघं जशी, राजा-राणी, रे
रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या ताऱ्यात डुलते तोऱ्यात
शोभते शुक्राची मी चांदणी, रे
No comments:
Post a Comment