तुझ्या प्रीतीचे दु:ख मला दाउ नको रे
वधुनि जाइ, प्राण घेइ, ठेवु नको रे
याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणी आहे जाउन लावा पत्ता
तिथे चालत जाइन आप अंगे स्वता
जाउन सांगा काही रानभरी होउ नको रे
जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्न टाकुन पदरात गार घेउ नको रे
छानच आहे तुमची गीतांजली 👌
ReplyDelete🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आबा
🙏