बघा ना छळतो हा,Bagha Na Chalato Ha

बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा ?
ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा !

आळ वृथा का या वाऱ्यावर, वाऱ्याहुन मन चंचल, आवर !
कशी आवरु हलता झुलता, तव नयनांचा आरसा !

इथेच झाले नील जलावर, स्वर्ग धरेचे मीलन सुंदर
प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा !

भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर
सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा !

No comments:

Post a Comment