मोठं मोठं डोळं तुझं,Motha Motha Dola Tujha

मोठं मोठं डोळं तुझं, कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात गावायची नाय्‌ रं !

नको दावू धाक मला, डोळं तुझं झाक
आल्यागेल्या भुलतिल, मी भुलायची नाय्‌ रं !

लाडीगोडी सोड, भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार नाय्‌ रं !

असशिल मोठा नाग, तर केवड्याखाली वाग
गुलाबाचा गेंद तुला लाभायचा नाय्‌ रं !

शिकारीची हाव तुला, हरिणीमागे धाव
रानातली साळू तुला मिळायची नाय्‌ रं !

पुरे तुझी ऐट, माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बधायची नाय्‌ रं !

No comments:

Post a Comment