पुनवेच्या घरी निळी गोजिरी, निजली अंगाई
नीज गुणिले नीज लवलाही
तव नयनीच्या नक्षत्राला दृष्ट व्हायची या चंद्राची
पुष्पदळे ही पापण्यांची, झणि लडिवाळे मिटुनी घेई
लाजविणारी जाईजुईला, करांगुळीची कोमलताही
गोड कहाणी सांगून तीही, अधुनीमधुनी देत जांभई
सर्व सुखांची प्रेमळ जननी, हळूहळू येई निद्रामाई
होऊन आता तुझीच आई, चुंबित राही वत्सलता ही
No comments:
Post a Comment