घनश्याम पाहिला मी घनश्याम पाहिला
दहिदुध लोणी घरी चोरिले
उखळाला मग तया बांधिले
धडपड करती हात चिमुकले
तो नंदलाल पाहिला
मोरपिसांचा मुगुट शोभतो
अधरी पावा मधुर वाजतो
गोपगोपिकांसवे नाचतो
मुरलीधर मी पाहिला
मेघासम तो श्याम सांवळा
हृदयमंदिरी माझ्या लपला
स्वप्नी दिसला मधुर हासला
मनमोहन मी पाहिला
No comments:
Post a Comment