Showing posts with label S-राम कदम. Show all posts
Showing posts with label S-राम कदम. Show all posts

रंग फेका रंग रे,Rang Pheka Rang Re

आले रे आले- रंगवाले

रंग फेका, रंग फेका, रंग फेका रे
रंगवा एकमेकां-
रंग फेका रंग रे, रंग फेका

घुमवा लेझीम, ढोल, नगारा
आज नाचवू गावच सारा
सनई-पावा घुमवा सूर
संगीताला आणा पूर
टाळ्या झडवा द्या ठेका
रंग फेका रंग रे, रंग फेका

आज पंचीम सण वर्षाचा
पाऊस पाडा सूख हर्षाचा
विसरा कामे विसरा रान
नाचनाचता विसरा भान
गुलाल-बुक्का मुखी माखा
रंग फेका रंग रे, रंग फेका

धनगराची मेंढरं गा,Dhanagarachi Mendhara Ga

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

अवो साजिरी दिसत्यात

ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती !
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं सरावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदत्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली !
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड

आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते सारं घडलं !
आन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला
उरलं त्याचं नाव

आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघाल तिथं दिसतंया सारं काळं !
आन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

घबाड मिळू दे मला,Ghabad Milu De Mala

घबाड मिळू दे मला रे खंडोबा घबाड मिळू दे मला
अरं भंडार वाहीन तुला रे खंडोबा घबाड मिळू दे मला


( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)

बारा कोसावर एक वाळी आहे, तिथं एक मारावाळी आहे,
त्याचा मोठा वाळा आहे, अन्‌ त्यावर महादरो आहे
आता पाहू दे मणभर सोनं मला रं भंडार वाहीन तुला

( घबाड मिळू दे ह्याला रे खंडोबा घबाड मिळू दे ह्याला)

मणभर सोनं ह्याले पाहिजे

( कोणासाठी ?... स्वत:साठी ..)
अन्‌ खंडोबाले देणार काय ?
हयद नुसती दोन चिमटी !
( बाप्पा हा सौदा झाला )

लेकरू होऊ दे मले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले
बकरू कापीन तुले ग मरिमाई लेकरू होऊ दे मले

( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )

मी अन्‌ माह्या दोन सवती कोन्या एकीलेही नाई संतती
त्याहींच्या आंधी कुरपा कर माह्यावरती
लोटांगण घालतो तुह्या पायावरती

( लेकरू होऊ दे हिला ग मरिमाई बकरू कापील तुला )

दगडाचा देव घेत नाही देत नाही
पापाची साथ कुणी करत नाही
नवसानं पोर कोणाले होत नाही
माणुस खादाळ देव काही मांगत नाही
देव म्हनता का धोंड्याला ?

धान म्हनता का कोंड्याला ?
( जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल )

गौरीहरा दीनानाथा,Gaurihara Deenanatha

गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय

दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय

तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझ ठाव न कळे देवा करू तरी काय

आली आली हो भागाबाई, Aali Aali Ho Bhagabai

तिनं साडी आणा म्हंटली .... आणली !
तिनं चोळी आणा म्हंटली .... आणली !
तिनं नथ आणा म्हंटली .... आणली !
तिनं बुगडी आणा म्हंटली .... आणली !

अहो दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली,

माडीवरची मंडळी खाली आली,
आली आली हो भागाबाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई बोलली हटून,
आणि लग्नाला बसली नटून,
अन्‌ तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही,
आली आली हो भागाबाई !


भागाबाई निघाली जत्रंला,
शंभर रुपयं बांधलं पदराला,
तिथं मांजर आडवंच जाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई पडली इरेला,
ह्यो बापई नवरा ठरिवला,
त्याच्या तोंडाला नाकच नाही,
आली आली हो भागाबाई !

अशी आमची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कड पात्तूर एकलीच ऱ्हाई
आली आली हो भागाबाई !



आई उदे ग अंबाबाई, Aai Ude G Ambabai

आई उदे ग अंबे उदे, उदे

आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आईची मूर्ति स्वयंभुवरि शोभली, सिंहावरी साजरी
सिंहावरी साजरी, हिऱ्यांचा किरिट घातला शिरी
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी
आई उदे ग अंबे उदे, उदे

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई