Showing posts with label S-बकुळ पंडित. Show all posts
Showing posts with label S-बकुळ पंडित. Show all posts

विकल मन आज झुरत,Vikal Man Aaj Jhurat

विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
सांगू कोणा ?

ही चांदरात, नीज नच त्यात,
विरह सखी मी कुठवर साहू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
कोणा सांगू ?

प्रिती सुरी दुधारी,Priti Suri Dudhari

प्रिती सुरी, दुधारी !
निशिदिनि सलते जिव्हारी !

सुखवी जिवास भारी !
मधुर सुखाच्या यातना,

व्याकुळ करिती सतत मनाला !
अमृताहुनी विषारी !

का धरिला परदेश,Ka Dharila Paradesh

का धरिला परदेश, सजणा
का धरिला परदेश ?

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे, राहू कैसी,
घेऊ जोगिणवेष ?

रंग न उरला गाली ओठी
भरती आसू काजळकाठी
शृंगाराचा साज उतरला,
मुक्त विखुरले केश

उगवला चंद्र पुनवेचा,Ugavala Chandra

गवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?