विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
सांगू कोणा ?
ही चांदरात, नीज नच त्यात,
विरह सखी मी कुठवर साहू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
कोणा सांगू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
सांगू कोणा ?
ही चांदरात, नीज नच त्यात,
विरह सखी मी कुठवर साहू ?
नाहि मज चैन, क्षणक्षण झुरति नयन
कोणा सांगू ?
No comments:
Post a Comment