Showing posts with label M-बाळ पार्टे. Show all posts
Showing posts with label M-बाळ पार्टे. Show all posts

माझी न मी राहिले,Majhi Na Mi Rahile

माझी न मी राहिले
तुजला नाथा, सर्व वाहिले
माझी न मी राहिले !

पहिली ती भेट होती
हसले मी गाली, ओठी
कळले ना मला वेडीला
वेड लावून गेली प्रीती
कशि फुलापरी उमलले

चांदण्याचे सूर झाले
गाइली मी धुंद गाणी
धुंद होती रातराणी
धुंद होते जीव दोन्ही
रंग रंगांतुनी मिसळले

सुख माझे ठेवु कोठे ?
मज माझा हेवा वाटे !
नच काही उणे संसारी
किति आनंद हृदयी दाटे
जन्मजन्मी तुझी जाहले !



पुनवेचा चंद्रम आला,Punavecha Chandram Aala,

पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुऱ्यात
खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

लाटांचे गीत निळे
काठाला ते गूज कळे
सागरकाठा भिडती लाटा
श्वासाला त्या श्वास जुळे
निळ्या निळ्या पाण्यात
एका खुळ्या गाण्यात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा
थरथरणारा एक शहारा
या रात्रीचा रंग नवा
लाजऱ्या या गालात
हृदयाच्या तालात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

अशीच अवचित भेटून जा,Ashich Avchit Bhetun Ja

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

स्वप्न सरावे आणि उरावी
काळी काजळरात

उरावी मागे काळी काजळरात

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

तुफान दर्या, चंदेरि रात
काठाला भिडली फेसाळ लाट
वादळ भरलंय्‌ बाहेर, आत
हातात दे ग, तुझाच हात

पुरे दुरावा, पुरे सजा
तुझाच मी ग, तुझा तुझा !

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !

इंद्रधनूचे रंग विरावे
संध्येच्या तिमिरात
विरावे कैसे संध्येच्या तिमिरात
विफल झाली प्रीतिपूजा

दूर गेला नाथ माझा
कापत राहे ज्योती
वादळत्या प्रहरात
जपावी कैशी वादळत्या प्रहरात ?

अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !