पुनवेचा चंद्रम आला,Punavecha Chandram Aala,

पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुऱ्यात
खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

लाटांचे गीत निळे
काठाला ते गूज कळे
सागरकाठा भिडती लाटा
श्वासाला त्या श्वास जुळे
निळ्या निळ्या पाण्यात
एका खुळ्या गाण्यात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा
थरथरणारा एक शहारा
या रात्रीचा रंग नवा
लाजऱ्या या गालात
हृदयाच्या तालात
तुझा माझा एकांत रे, साजणा !

No comments:

Post a Comment