Showing posts with label M-आर. एन्‌. पराडकर. Show all posts
Showing posts with label M-आर. एन्‌. पराडकर. Show all posts

मी खरंच रुसले Mi kharach rusle

मी खरंच रुसले, उगाच चिडवू नका
गडे, तुम्हि माझ्याशि बोलू नका

मला हसून का हो हसवता ?
मला रुसून का हो फसवता ?
मी हसायची नाही, मी फसायची नाही
माझ्या नादाला लागू नका

तुमचे लाडिक हसरे बोल
नाही जायचा अशानं तोल
फोल लाडीगोडि, नका घालू कोडी
मला भोळीच समजू नका

इश्श, कशाला धरता पदर
जरा बाजुला घ्या ना नजर
बरं बोलेन हं मी, बाई भारिच तुम्ही
भीड भलतीच घालू नका


Lyrics - Sudhanshu सुधांशु
Music - R N Paradkar आर. एन्‌. पराडकर
Singer - R N Paradkar आर‌. एन्‌. पराडकर

माझी देवपूजा पाय तुझे,Majhi Devpuja Paay Tujhe

माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ॥१॥

गुरु चरणाची माति तेचि माझी भागिरथी ॥२॥

गुरुचरणाचा बिंदु तोचि माझा क्षीरसिंधू ॥३॥

गुरुचरणांचे ध्यान तेचि माझे संध्यास्नान ॥४॥

शिवदिन केसरी पाही सद्गुरुविना दैवत नाही ॥५॥

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ,Digambara Shripad Vallabha

दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो
दत्तगुरूंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक
अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हाति धरा

दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे
कळिकाळाचे भय न जरा

हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता
योगज्ञान-उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता
भवसागर हा पार करा

दत्तदिगंबर दैवत माझे,Dutta Digambar Daivat

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे

त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे