दत्तदिगंबर दैवत माझे,Dutta Digambar Daivat

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे

त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे

No comments:

Post a Comment