दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो
दत्तगुरूंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक
अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हाति धरा
दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे
कळिकाळाचे भय न जरा
हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता
योगज्ञान-उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता
भवसागर हा पार करा
No comments:
Post a Comment