चंद्र दोन उगवले जादू काय ही तरी ?
एक चंद्र अंबरी, एक मंचकावरी !
मेघ सावळे तया टाकतात झाकुनी
केस रेशमी मुखा पाहतात वाकुनी
अमृत ओति भूवरी चंद्र तो नभातुनी
अमृतबिंदू तेच या खेळती ओठांवरी
शीतल जरि चंद्रमा तो तनूस पेटवी
चंद्र पाहताच हा दाह शांत हो उरी
तो शशांक राहिला लक्ष योजने दुरी
सहज लाभला मला चंद्र हा इथे घरी
No comments:
Post a Comment