मनी अचानक MANI ACHANAK

मनी अचानक हलले काही
वाऱ्यावर दरवळले काही
भरती येता उधाणलेली
लाट आतुनी शहारलेली
सावरताना ढळले काही

गंध दिवाणा स्पर्श पाहुणा
हवा कशाला नवा बहाणा
नजरेमधूनी कळले काही
तू असण्याचा धुंद केवडा
तू नसताना दिवस बापुडा
शब्दांमधूनी ओघळले काही

हात हाती या विश्वासाचा
अर्थ सांगतो सहवासाचा
सखे सोबती आकळले काही


Lyrics -दासू DASU
Music -मंगेश धाकडे MANGESH DHAKADE
Singer -मंगेश धाकडे - कीर्ती किल्लेदार MANGESH DHAKADE-KIRTI KILLEDAR
Movie / Natak / Album -दुसरी गोष्ट (२०१४) DUSARI GOSHT 2014

2 comments:

  1. Can someone tell me the meaning of
    "बापुडा"

    ReplyDelete
  2. साधा, Normal

    ReplyDelete