पुनवला गिराण का देवा का रे देवा
पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा
पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा
दरीयाच्या लाटंला या माग पुढं ओढ का
माणसाला देवा तुझ सुटलं या कोड का
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी
कसा उलटतो फासा कशी चाले नियती
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी
जिंदगाणी एकटी
चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
वात नाही ...
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
वाट नाही ...
चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही
नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही
किर्र काळोखापल्याड सोनेरी पहाट नाही
जल्म देतो देव ...
जल्म देतो देव देतो मरण शेवटी
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी ...
जिंदगाणी एकटी
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी
Lyrics - देवाविना माणसाची जिंदगानी एकटी
Music -
Singer -
Movie / Natak / Album - देउळ बंद