पैठणचा शालू आज मला,Paithanacha Shalu Aaj Mala

पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

मोरपंखी नवा जरतारी, सूत असावं शंभर नंबरी
पक्क्या रंगाचा तो नऊवारी, तुम्ही आणा मला कारभारी
लांबीरुंदी बघुनी घ्यावी पदरावरचा साज, साज, साज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

तुम्ही गुणाचं हाय कारभारी, जीव माझा ह्यो तुमच्यावरी
ओढ लागली ही आज न्यारी ग बाई ओढ लागली ही आज न्यारी
करा तयारी निघा लवकरी कुठवर सांगु रोज, रोज, रोज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

हौस माझी पुरवा धनी, बाईल तुमची मी देखणी
ह्या चंद्राची ही चांदणी तुम्हा सांगते हो विनवुनी
आणत्याल शालू गोड गोड बोलू करू मनाचं राजं, राजं, राजं
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज !

No comments:

Post a Comment