डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस Darling Darling Kay Mhantos

डार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस ?

अरे भलताच बाईल येडा दिसतोस !रूप बावळं झिपरं केस

हिप्पीवानी सारा वेष

घर ना दार

भुईला भार


घरावर चकरा काय मारतोस ?दारु-मटक्याचा नाद तुला

चोरीचीही ठाव कला

पत्त्याचा इमला

तुला ना जमला

महालाची बात आता काय करतोस ?नार मी मोठ्या घरची रं

बापही माझा पाटील रं


साधुन मोका

मारतोस धक्का

हातात इस्तव काय धरतोस ?No comments:

Post a Comment