गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधीसी या यमुनेच्या जळी ?
ती वनमाला म्हणे, "नृपाळा हे तर माझे घर.
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर.
हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा"
"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला
तू वनराणी दिसे न भुवनी तुझिया रूपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी ?
तव नयनी या प्रेमदेवता धार विखारी भरी
अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी
भुलले तुजला हृदय साजणी ये चल माझ्या घरी"
No comments:
Post a Comment