Showing posts with label M-वसंत आजगावकर. Show all posts
Showing posts with label M-वसंत आजगावकर. Show all posts

हात धरी रे हरी HAT DHARI RE HARI

हात धरी रे हरी, पहा पण
करात माझ्या वाजे कंकण

कुंजवनाच्या मार्गावरती
कमल ताटवे नाजूक फुलती
तिथे रमावे तुझ्या संगती
परि पायी हे अडती पैंजण

गोपवधू मी तुळस मंजिरी
एकाच आशा असे अंतरी
पावन व्हावे तुझ्या मंदिरी
अबोल झाले हे मृगलोचन

दीप असे तू मी तर ज्योती
प्रीतरथावर तूच सारथी
पैलतीरावर नेई श्रीपती
परि मेखला करिती किणकिण

Lyrics - मधुकर जोशी Madhukar Joshi,
Music - वसंत आजगावकर Vasant Aajgaokar,
Singer - माणिक वर्मा Manik Verma,

स्मरा स्मरा हो,Smara Smara Ho

स्मरा स्मरा हो दत्तगुरू
दत्तगुरू भवताप हरू

दत्तगुरूंचे नाम मधुर हो
गुरूपद पावन स्मरा चतुर हो
दत्तकृपे भवसिंधु तरू

भस्मांकित तनु कटी पितांबर
जटामुकुट शिरि त्रिशुळ डमरुधर
ध्यान गुरूंचे शुभंकरू

दत्तगुरू स्मरताच धावतो
दत्तगुरू भक्तास पावतो
दत्तगुरूंचे चरण धरू

मनी माझिया नटले गोकुळ,Mani Majhiya Natale Gokul

मनी माझिया नटले गोकुळ
मी राधा तू कान्हा प्रेमळ

वाजविता तू मधुर बासरी
नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी
खट्याळ हसते कालिंदीजळ

मथुरेच्या रे वाटेवरती
आडविसी तू धरुनी हाती
खुशाल लुटिसी दहिदुधलोणी
गोपसख्या, तू भारी अवखळ

यमुनाकाठी रास रंगतो
रमतो आपण, मीपण हरतो
अंध जगाला कशी दिसावी
अपुली प्रीती, अपुले गोकुळ ?



भुलविलेस साजणी,Bhulaviles Sajani

भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी
फुलविलेस मन्मनी स्वप्न एक कांचनी

तू न रूपगर्विता
तू न धुंद चारुता
सांज-सांवळीच तू, सांडिलिस मोहिनी

तू न गायिका कुणी
गाइलिस रागिणी
बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी

तू सुशील साधिका
स्नेहशील दीपिका
प्रेमभाव उधळुनी जाहलीस स्वामिनी

पाषाणातुनी वेड्या का तू,Pashanatuni Vedya Ka Tu

पाषाणातुनी वेड्या का तू बघसी रे श्रीराम
अंतरी आहे आत्माराम

त्या देहाच्या देव्हाऱ्यातुन ज्योती उजळत नयनदळातून
दोन करांची माला वाहुन कर भक्ती निष्काम

निर्मल गंगा करुन मनाची कावड न्यावी पावित्र्याची
मन कमळावर तुझ्याच आहे प्रभू जानकी-राम

वेदाहुन ते पवित्र सुंदर हृदय असू दे सदा निरंतर

आसवातही वाट भक्तिची त्यातच मेघ:श्याम

आली कुठूनशी कानी, Aali Kuthunshi kani

आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोमरोमांतुन

नभी तेजात नाहली, चंद्रभागा चंद्रायणी
बोले शब्दावीण काही, चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात, शहारले अंग‍अंग
मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
जसे कटीवरी हात, युगे अठ्ठावीस उभा

भूक नयनांची सरे, मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू, तुकयाच्या अभंगात