Showing posts with label S-वसंत आजगावकर. Show all posts
Showing posts with label S-वसंत आजगावकर. Show all posts

स्मरा स्मरा हो,Smara Smara Ho

स्मरा स्मरा हो दत्तगुरू
दत्तगुरू भवताप हरू

दत्तगुरूंचे नाम मधुर हो
गुरूपद पावन स्मरा चतुर हो
दत्तकृपे भवसिंधु तरू

भस्मांकित तनु कटी पितांबर
जटामुकुट शिरि त्रिशुळ डमरुधर
ध्यान गुरूंचे शुभंकरू

दत्तगुरू स्मरताच धावतो
दत्तगुरू भक्तास पावतो
दत्तगुरूंचे चरण धरू

भुलविलेस साजणी,Bhulaviles Sajani

भुलविलेस साजणी, तू विलोल लोचनी
फुलविलेस मन्मनी स्वप्न एक कांचनी

तू न रूपगर्विता
तू न धुंद चारुता
सांज-सांवळीच तू, सांडिलिस मोहिनी

तू न गायिका कुणी
गाइलिस रागिणी
बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी

तू सुशील साधिका
स्नेहशील दीपिका
प्रेमभाव उधळुनी जाहलीस स्वामिनी

आली कुठूनशी कानी, Aali Kuthunshi kani

आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोमरोमांतुन

नभी तेजात नाहली, चंद्रभागा चंद्रायणी
बोले शब्दावीण काही, चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात, शहारले अंग‍अंग
मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
जसे कटीवरी हात, युगे अठ्ठावीस उभा

भूक नयनांची सरे, मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू, तुकयाच्या अभंगात