मी रवि किरनातुन आले रे MI RAVI KIRNATUN AALE RE

मी रविकिरनातुन आले रे
फुलाभोवती गाता गाता
रंग उषेचे ल्याले रे

तृणपात्याच्या करुण झुला रे
झुलते वारया वरती
हळुच होतसे लाट निशेचि
ढळत्या प्राचीवरती 
पहाट होता दवबिंदुचे
प्राक्तन मी झाले रे

कुणी ओतिला गंध जुईचा
माझ्या पंखावरती
मला उमगली तुझी वेदना
आगीहुनहि जळती
कवाड उघडून हसले डोळे
फुंकर मी झाले रे


Lyrics -प्रवीण दवणे  PRAVIN DAVNE
Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Singer -उषा मंगेशकर  USHA MAANGESHKAR

No comments:

Post a Comment