थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती
मधुर स्वप्ने मीलनाची, लाविती मज वेड का ती
रंगवीण्या स्वप्न माझे, पाहिजे मज तूच रे
रंगणे ना रंगवीणे, ते तुझ्या हाती
अळविते मजला तया मी, टाकिते झिडकारुनी
अळविते तुज तान भरुनी, याचनेची रागिणी
ऐकणे ना ऐकणे रे, ते तुझ्या हाती
उपवनी सुमने उमलती, भ्रमर ते मधुगंध लुटती
हृदय-पुष्प तुला दिले, जे एकदा उमले
चुंबिणे ना चुंबिणे रे, ते तुझ्या हाती
No comments:
Post a Comment