Showing posts with label बेला शेंडे. Show all posts
Showing posts with label बेला शेंडे. Show all posts

जीव गुंतला तुझ्यात JIV GUNTALA TUZYAT



इश्क हो गया
मुझे पता है
तुझको भी हो गया है ना
जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

मुकेच होती शब्द सारे
मुक्यामुक्याच भावना
समोर तू अजून की रे
पुन्हा तुझा आभास हा
जिथे न तू तिथेही
कुठून सांग येई
तो गंध त्या तुझ्या मिठितला
उधान हे  सुखाचे
की खेळ या मनाचे
सतावती मला तुझ्याविना
जीव गुंतला तुझ्यात

तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

मिटून पापण्या मी पाहते ते तुला
सुखावते मनी जरा  जरा
जिथे न तू तिथेही
तुझ्या सुरात साद देई एकांत वेडा
ताल बावरया स्पंदनाचा
ऐकू येत असे सारखा
काय मागने या क्षणाचे
सांग ना सांग ना सांग ना

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का  


Lyrics -GURU THAKUR गुरु ठाकुर
Music -SAGAR MADHUR सागर मधुर
Singer -SWAPNIL BANDODKAR,BELA SHENDE स्वप्निल बांदोडकर ,बेला शेंडे
Movie / Natak / Album -ISHAQ WALA LOVE इश्क वाला लव

सर सुखाची श्रावणी SAR SUKHACHI SHRAWANI



थांब ना तू कळु दे थांब ना

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ 

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा…खेळ हा तर कालचा… पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा ।।

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता…वाटतो आता…उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा ।।

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा ।।

Lyrics-गुरु ठाकुर GURU THAKUR
Music-निलेश मोहरीर NILESH MOHARIR
Singer -अभिजीत सावंत ,बेला शेंडे, ABHIJIT SAWANT, BELA SHENDE
Movie / Natak / Album -मंगलाष्टक वन्स  मोअर MANGALASHTAK ONCE MORE

जाणता अजाणता JANATA AJANATA



जाणता अजाणता

कुठुन येई असे प्रेम हे

जाणता अजाणता

कवेत असे प्रेम हे

जसे अलगद वार्या  सवे 

दरवळती गंध नवे

जसे अवखळ स्पंदनांचे

गुनगुनते गीत नवे

गुंतता ह्रदय हे

क्षणात होई मन बावरे

श्वास हे आभास  हे

बेधुंद सारे हे कसे

अबोल ही

चाहूल अंतरात का दाटली

मेघात ओली ही नशा

ओ ओ ओ

Singer -शान ,बेला शेंडे  SHAAN,BELA SHENDE
Movie / Natak / Album -लग्न पहावे करुण २०१३  LAGN PAHAVE KARUN 2013 

असा तु ASA TU

असा तु,भास तु ,ताल तु
खुललेल्या श्वसनाचा रात तु ,प्रीत तु ,अर्थ तु
मिटल्या ओठांचा ,पडसाद ओठी श्वसनाचे
श्वासात मौनाचे ,मौनात खुलती आज नवे ,
हे अर्थ स्पर्शाचे

असा तु,भास तु ,ताल तु
खुललेल्या श्वसनाचा रात तु ,प्रीत तु ,अर्थ तु
मिटल्या ओठांचा ,पडसाद ओठी श्वसनाचे
श्वासात मौनाचे ,मौनात खुलती आज नवे ,
हे अर्थ स्पर्शाचे

अंतरी बेभान,चांदण्यांची रात का
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गोज का,
का हर उठते मनी का ,
रंग गेलास का हो चिंब आंगवारी ,का अश्या वारा
जीव होई जणू काजवा ,पडसाद स्पर्शाचे मौनाचे ,मौनात
श्वासाचे श्वासात रुजति ,अर्थ नवे
कालवर ओठांचे ,असा तु,भास तु ,ताल तु
खुललेल्या श्वसनाचा रात तु ,
प्रीत तु ,अर्थ तु मिटल्या ओठांचा

Music -ऋषिकेश कामेरकर RISHIKESH KAMERAKAR
Singer -स्वप्निल बांदोडकर ,बेला शेंडे SWAPNIL BANDODAKAR,BELA SHENDE
Movie / Natak / Album -टाइमप्लीज TIMEPLEASE