Showing posts with label नाव मोठं लक्षण खोटं (१९७०). Show all posts
Showing posts with label नाव मोठं लक्षण खोटं (१९७०). Show all posts

शोधू मी कुठे कशी,Shodhu Mi Kuthe Kashi

शोधू मी कुठे, कशी, प्रिया, तुला ?
प्रीती का देई साद ही मजला ?

दिसे कुणी मज पुन्हा लपते ग
घुमते का शीळ इथे ?
पदरी मी भास खुळे जपते ग
हलले का पान तिथे ?
वारा हा काही सांगतो मजला !

ओळखीची खूण काही पटते ग
नच झाली भेट जरी
डोळियांच्या पापणीत मिटते ग
उमटे जे बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला ?

या रावजी बसा भावजी,Ya Ravaji Basa Bhavaji

या रावजी, बसा भावजी
कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी

वळक तुमची धरून मनी
काय करू सांगा तुमची अहरजी
तुम्हा बघुन डावा डोळा झाकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी
तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी
अशी रोखा नजर त्यात भरलं जहर
घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

रूप रंगाच्या महाली सुख माजं रंगलं
काळजाच्या झुंबराला दु:ख माजं टांगलं
नको पर्वा आता माजं जीणं लुटा
असा जुगार उलटा मी हो मांडला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

रोज बुरखा नवा रोज नवी मजा
तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा
तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन
ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला



मी जलवंती मी फुलवंती,Mi Jalavanti Mi Phoolavanti

मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात जाईजुईच्या फुला रं

मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं ............ लाज वाटती !
काय म्हणू तिला ? .... ती हाय पिरती !

तुझ्या रुपाचं, रुपाचं डोळ्यात हासू फुटं
तुझ्या संगतीनं, संगतीनं उमलून पाकळी मिटं
रुसावं, हसावं, उगीच फसावं, कुठं ही शिकलीस कला ?

या पावसात झाले ओलेचिंब, गोऱ्या गाली मोतियांचे थेंब
दोघांत निवांत मिळाला एकांत, भेटीचा मोका आला

नको रे नंदलाला,Nako Re Nandalala

नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !

भरुनिया रंग पिचकारी
भीजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा, हरे रामा

अंगणि माझ्या करिसी दंगा
वेळिअवेळी तू, श्रीरंगा

भलत्या ठायी झोंबसि अंगा
गौळणी भवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारद रात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !
खुदुखुदु हससी, रे गिरिधारी
कशि रागावू तुजसि, मुरारी ?
अवचित अडविसि यमुनातीरी
किती सोसावी ही शिर्जोरी ?

मागशील भलते काही

हरि, तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !

नको रे नंदलाला,Nako Re Nandalala

नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !

भरुनिया रंग पिचकारी
भीजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा, हरे रामा

अंगणि माझ्या करिसी दंगा
वेळिअवेळी तू, श्रीरंगा

भलत्या ठायी झोंबसि अंगा
गौळणी भवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारद रात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !
खुदुखुदु हससी, रे गिरिधारी
कशि रागावू तुजसि, मुरारी ?
अवचित अडविसि यमुनातीरी
किती सोसावी ही शिर्जोरी ?

मागशील भलते काही
हरि, तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !