नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !
भरुनिया रंग पिचकारी
भीजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा, हरे रामा
अंगणि माझ्या करिसी दंगा
वेळिअवेळी तू, श्रीरंगा
भलत्या ठायी झोंबसि अंगा
गौळणी भवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारद रात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा, हरे रामा
नको रे नंदलाला, नंदलाला !
खुदुखुदु हससी, रे गिरिधारी
कशि रागावू तुजसि, मुरारी ?
अवचित अडविसि यमुनातीरी
किती सोसावी ही शिर्जोरी ?
मागशील भलते काही
हरि, तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा, हरे रामा
नको रे नंदलाला, नंदलाला !
No comments:
Post a Comment