न्याहरी कृष्णाची घेउनी
निघाली गवळण वृंदावनी
वैशाख तापतो, ऊन न लागे तिला
टोचता कळेना काटाही पाऊला
हरीवेडी होउनी-
निघाली गवळण वृंदावनी
आजच्या पहाटे हाक मारल्याविना
श्रीरंग जाई तो घेउनिया गोधना
यमुनातटी चालली-
निघाली गवळण वृंदावनी
एकांत पाहुनी भेटुन मनमोहना
आपल्या करे ती भरवील दध्योदना
हनुवटी कुरवाळुनी-
निघाली गवळण वृंदावनी
No comments:
Post a Comment